STORYMIRROR

UMA PATIL

Romance

3  

UMA PATIL

Romance

राजसा

राजसा

1 min
14.8K


मोगऱ्यासारखा राजसा

चंदनासारखा राजसा


तो छळे रोज प्रेमात मज

मांजरासारखा राजसा


मज दिले जे वचन पाळतो

युधिष्ठिरासारखा राजसा


रात्र अंधारली ये अता

चांदण्यासारखा राजसा


भास होती तुझे नेहमी

कवडश्यासारखा राजसा


नित्य गंधाळतो तू नवा

केवड्यासारखा राजसा


जीवनाचा लढा जिंक तू

मावळ्यासारखा राजसा


गीत गाऊन जिंकतो मने

गायकासारखा राजसा


नायिका मी इथे तू मला

नायकासारखा राजसा


दुःख सामावतो तू उरी

सागरासारखा राजसा


आवडे तू 'उमा'ला सदा

माझियासारखा राजसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance