राजमाता जिजाऊ
राजमाता जिजाऊ
थोर माऊली,माय जिजाऊ,
शुरविर शिवरायांची!!
तुम्हीच रोवली,मेढ भक्कम,
बलवंत स्वराज्याची!!
तुम्हीच केले संस्कार माते,
हृदयावरी शिवबांच्या!!
बळकट केले बाहु त्यांचे,
शिकवूनी कला शौर्याच्या!!
पुत्र घडविला असा,
ज्यांनी चीत केली मुघलशाही!!
शत्रुवरी मात करूनी,
गायली स्वातंत्र्याची नवलाई!!
केले हो त्याग,दिले हो बलिदान,
घेतले धडे संघर्षाचे!
तुमच्याच कर्तृत्ववाने स्वप्न साकारले,
मराठा साम्राज्याचे!!
वेळ प्रसंगी दिलात लढा,
झालात तुम्ही विरांगणा!!
संकटांना पाजुन पाणी,
फडकवला हिंदूत्वाचा झेंडा भगवा!!
आठवण होते आज नव्याने,
आऊसाहेब तुमच्या धैर्याची!!
वाटते पुन्हा जन्मास यावी,
तु गं माय स्वराज्याची!!
