STORYMIRROR

दत्तात्रय वाळुंजे पाटील

Inspirational

3  

दत्तात्रय वाळुंजे पाटील

Inspirational

राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

1 min
318

असे लाखात एक । राजा शिवाजी नेक । घडले पराक्रम कैक । वाली रयतेचा ।।

होते मातेचे संस्कार । दिधला स्वराज्याचा विचार । सोसुनी संकटांचा भार । उद्धरिले दिनजना।।

वेळ काळ तो अघटित। अन्याय होतसे बहुत । करुनि त्यावरी मात । उभे केले स्वराज्य ।।

करी स्त्रीत्वाचा सन्मान । देऊनी मातेचे ते स्थान। उपटूनी अन्यायाचे कान। भेदाभेद हरपला ।।

ज्यासी अन्नदात्याची कीव। संपत्तीची नसे हाव । घालुनी अन्यायावरी घाव । देठ न जाई रयतेचा ।।

मावळे ज्याचे थोर। एकाहुनी एक ते शूर । नसे जिवाचाही घोर। रयतेच्या सुखासाठी।।

कुणी बाजी, कुणी तान्हा ।जाळूनी जीवाचा तो पान्हा ।वाढवी मराठीचा बाणा। डंका दाहीदिशी ।।

कीर्ती राहील अपार। उपकार ज्याचे फार। तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ।।


Rate this content
Log in

More marathi poem from दत्तात्रय वाळुंजे पाटील

Similar marathi poem from Inspirational