Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

स्वच्छ भारत

स्वच्छ भारत

1 min
204


होऊया सादर, करूया जागर

स्वच्छ अभियानाचा ।

हातात घेऊन झाडूचे हत्यार ।

मंत्र हा आरोग्याचा ।

होईल स्वच्छ नी सुंदर भारत ।

ध्यास हा स्वच्छतेचा।

तुझ्या हाती आहे देश सारा, सोपी करू वाट उद्याची रे ।

स्वच्छ भारत, माझा स्वच्छ भारत ।।


ओला कचरा हिरव्या डब्यात।

सुखा कचरा निळ्या डब्यात ।

निरामय जीवनाचा मार्ग हा खरा ।

घरदार स्वच्छ करू, अंगणातील केर भरू ।

घंटागाडी येता डबे रिकामे करू ।।


प्लास्टिक बंदीचे करून स्वागत,

पार्यायी वस्तू वापरू ।

कागदी पिशव्या , कापडी पिशव्या

नित्य नवा मार्ग धरू ।

शौचालयाचा करू वापर,

रोगराईला पळवू दूर ।

निर्मळ होईल, हर्षुनी जाईल

आज ही वसुंधरा ।

होईल साकार स्वप्न बापूजींचे,

ध्यास हा मनी धरा ।

आनंदी राहूया, निरोगी जगुया

धागा हा आयुष्याचा ।

निर्मळ मनाने, प्रेमभावनेने

स्वप्न हे साकार करूया ।

स्वच्छ भारत, माझा स्वच्छ भारत ।।


Rate this content
Log in

More marathi poem from दत्तात्रय वाळुंजे पाटील