पुष्पराज
पुष्पराज
उमलला होता पुष्पराज एक बागे मध्ये,
पाने, कळया आणि काट्यांमध्ये।
तरीही तो हसत राहिला।
मधुकर आला रस पानाचा आस्वाद घेतला।
फुलपाखरा ने ही त्याजवरी थोड़ा विश्राम केला।।
तरीही तो हसत राहिला।
मधमाशी ने मधु सारा गोळा केला।
गुण गुण गीत गात साजरे मग पोबारा केला।।
तरीही तो हसत राहिला।
मग तेथे एक माली आला।
तोडूनी त्याला टोपलीत टाकला।।
तरीही तो हसत राहिला।
मग सजविले त्याला गुलदस्त्यात,
केली विक्री फूल बाजारात ।
तरीही तो हसत राहिला।
प्रियकराने एका मग त्यास विकत घेतले,
प्रेयसीला भेंट देऊनी मन जिंकले।
तरीही तो हसत राहिला।
रंग त्याचा कुणा आवडला ,
रूपात त्याच्या कोणी हरवला।
पिऊनी मधुरस त्याचा मदहोश कोणी,
गंध घेउनी गाई कोणी प्रेमाची गाणी।
इवल्याश्या या त्याच्या जीवन -काली,
परोपकारा ने दुनिया त्याची बहरली।
भूतकाळाचा पश्चाताप नसें,
भविष्याची ना चिंता असे।
रंग -रूप अन् गंध लाभले ,
ते तो सारे वाटत असे।
उमलने, बहरने, आणी कोमेजून जाने,
धर्म हा तो निभावत गेला।
म्हणूनच तो हसत राहिला।
तरीही तो हसत राहिला।
