आशा
आशा
तुझा अंगणात तार् याची वरात ,
झगमगाहाटात नाहले तुझे जीवन ,
त्यातील थोड्या प्रकाशाची मी केली आशा.
सुवास दरवळतो नेहमी तुझ्या दारात ,
उधळण सुमनांची तुझ्या घरात .
त्यातील काही पाकळ्यांची केली मी आशा.
तुझ्या महफिलीत नेहमी सुरांची साथ ,
मृदंगाच्या गालावर पडती मंजुळ थाप.
नृपुरांच्या रुणझुण बोलांची केली मी आशा.
झाली प्रत्येक वेळी जरी निराशा,
पुन्हा उदयाती तशीच आशा
.तुझ्याच मुळे जीवन माझे मला भेटले,
म्हणूनच तुझयाच पुढे मी नतमस्तक झाले.
