STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy

3  

Shobha Wagle

Tragedy

पुरातन वाड्याची भग्नावस्था

पुरातन वाड्याची भग्नावस्था

1 min
342

किती होते तुझे वैभव जणू सोन्यात मढलेले

नको वाटे तुला आता असे बघणेच तुटलेले


पुरानी खास डौलाची इमारत पूर्वजांची तू

तुटे काळीज बघताना अता मातीत पडलेले


चिरेबंदी असा वाडा इथे वैभव जरी होते

तरी आता असा उघडा बघा कोणीच नसलेले.


किती डौलात वाडा हा दिमाखाने उभा होता

परी घर वाटते आता भुतांसाठीच बनलेले


अता जाणे तशा जागी भितीदायक किती आहे

तरीही आठवण येते जुन्या काळी बघितलेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy