पुन्हा का आलीस
पुन्हा का आलीस
तू प्रेम केलंस मी प्रेम केलं
इथं पर्यंत सारं काही ठीक होतं
तू सोडलंस मी नाही सोडलं
मनाच्या गाभाऱ्यात घरटं बांधन
अन तू तिथं नकळत नांदन
इथं पर्यंत सारं काही ठीक होतं
दिस उजेडला दिस मावळला
वेळ निघून गेली तू संसार आवरला
मंगळ सूत्र घातलंस पण मणी
किती याचं गणित नाही सोडलंस
तुला कसं कळणार तू तू नव्हतीस
मी फक्त एक प्यादा होतो सारीपाटाचा
खेळ तू खेळत होतीस मी मात्र
निपचीत उभा होतो निर्जीव सारखा
कारण तू कधी आपलंसं मानलं नाही
नेहमी तुझ्या नजरेत मी होतो परका
जाऊदे सोड मी पण काय घेऊन बसलो
तुझा नकार होकार समजून हसलो
वेड प्रेम केलं मी हेंच जरासं कोड पडलं
हेच आयुष्यच गणित जरासं मला नडलं
इथं पर्यंत सारं काही ठीक होतं
गेलीस तर गेलीस पुन्हा का आलीस
पुन्हा एकदा हृदय धड धड धडकलं
तुझ्या चेहऱ्यावरच हसू अन त्याला रुसू
याच गुपित आज वर मला नाही कळलं

