STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

4  

Bharati Sawant

Romance

प्रतिक्षा सख्याची

प्रतिक्षा सख्याची

1 min
152

प्रतिक्षा सख्याची

वाट पाहते सख्याची

या नां हो परतुनि धनी

धडधडतेय माझ्या उरी

अभद्र विचार येई मनी

निघालेय राऊळी आता

घालते साकडेच देवाला

शिवशंभुची करते भक्ती

पावेल माझ्या नवसाला

हुरहूर लागलीय मनाला

नयन हे तुमच्या वाटेला

रस्ता झालाय वळणाचा

पदरव ऐकवा कानाला

नथ घालुनीच मी सजले

कुंतलात फुलांचा गजरा

नदीतीराच्या राऊळातुन

वळती अनेकांच्या नजरा 

तांब्याचा कलश निरांजन

घेऊनी तबकही मी हाती

पूजिते भावभक्तीने ईश्वरां

भिजवल्यात तुपाने वाती

इरकली लुगडे नेसले मी

चापूनचोपून हे विटकरी

बांधा शेलाटा असे माझा

तुम्ही सुखाचेच वाटेकरी 

गळा शोभतेय मंगळसूत्र

सोज्वळ रूप दिसे गोजिरे

हिरवळीतूनीच चालताना

पाऊल पडते असे साजिरे 

या बिगीबिगी हो झडकरी

नयन माझे पहा आसावले

तुमच्या मिलनास अतृप्त

अश्रूंनी होतील मग ओले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance