प्रश्नास ही वाटते
प्रश्नास ही वाटते
निरूत्तर होतात क्षाणाचे निखारे
निःशब्द होतात मनाचे पसारे
सल मनाची रुतता खोलवर
अबोल छलतात का भावमनोरे
निज पापाणीस सलते आस का रे
नजरेत ती आसक्ततता कसली रे
काल अनोळखी होतच ते वारे
आज आपुलकीचे वाटे पहारे
मनी शोधता भेटतील खुमारे
निशब्द होतात प्रश्नांचे सहारे
क्षणात गुंतुनी पहाट निखारे
प्रश्नास ही वाटे न द्यावे उत्तरे
