प्रियतमा
प्रियतमा
नवपरिणिता सौदर्य कामिनी
वस्त्रा अलंकारांनी नटली
मधुचंद्राची यामिनी आली
फुलांची शेज ही सजली.
मोगऱ्यांचा गजरा कुंतलात
आसमंत दरवळतो सुगंधाने
मन मोहुनी मज करी हर्षित
बे धुंद झालो तुझ्या प्रेमाने.
पोर्णिमेची चांदणी रात्र रुपेरी
प्रतिबिंब पाहे आरसा बिलोरा
प्रियतमा तू माझी साजणी
तुझ्या प्रेमाचा फुलला फुलोरा.
गोऱ्या करी शोभे हिरवा चुडा
किणकिण साद घाली मला
तुच लाजवंती स्वर्गीय अप्सरा
आली मज भेटाया रंगमहाला.

