प्रितीने वसंत फुलला
प्रितीने वसंत फुलला
फुलला वसंत प्रेमाचा
वाहे झरा हा प्रीतीचा ॥धृ॥
साथ तू देई साद घालता
अधीर मन होई तुला भेटता ॥१॥
हृदयी असे हा ओलावा
मनाला स्पर्शुनी जाई गारवा ॥२॥
हृदय भेटण्यास व्याकुळ होई
तुला पाहता हर्षुनी मन जाई ॥३॥
गुंफुनी बंध प्रेमाचे बांधू या गाठी संगमाने
मिलन व्हावे दोघांचे घायाळ झालो तुझ्या नजरेने ॥४॥
स्पंदनानी मनात मकरंद फुलात फुलला
आपल्यातील विरह दूर त्याने झाला ॥५॥

