प्रेमच एक पाखरू●●
प्रेमच एक पाखरू●●
उडून गेलं आज हृदयातून माझ्या
प्रेमाचं एक पाखरू
तोडून गेलं माझ्या मनाचा पिंजरा
मी शोधू कुठे हे पाखरू..
जपून ठेवलं मी या पाखराला
काळजाच्या या घरट्यात माझ्या
माझ्या प्रेमाचं एक प्रतिक होतं
उडून गेलं जे पाखरू..
खूप जीव लावला मी या पाखरावरती
प्रेमाच्या नव्या या आशेवरती
सुर्य मावळला या मनात माझ्या
मनातून उडून गेलं एक पाखरू..
मला सोडून गेलं जे पाखरू
माझ्या या मनाला कसं मी सावरू
होत माझ्या प्रेमाचं एक पाखरू
