STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Romance

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Romance

प्रेमात

प्रेमात

1 min
128

प्रेमाला नाव नसते, नावे वेगवेगळी मिळतात प्रेमात.

प्रेमाला शब्द नसतो, निशब्द सर्वच होतात प्रेमात.

प्रेमाला आवाज नसतो, भावना स्पष्ट होतात प्रेमात.

प्रेमाला भाव नसतो, अर्थ सर्व कळतात प्रेमात.

प्रेमाला स्पर्श नसतो, जाणिवेच्या संवेदना जागतात प्रेमात.

प्रेमाला गंध नसतो, सुगंधी सर्व जीवन होते प्रेमात.

प्रेमाला रंग नसतो, सप्तरंगी जीवन होते प्रेमात.

प्रेमात घात कधी नसतो, निष्ठा वाढते पदोपदी प्रेमात.

प्रेमाला वासना नसते, प्रणय झरे मात्र वाहतात प्रेमात.

प्रेमाला हद्द नसते, अनंतमय सर्व होते प्रेमात.

प्रेमाला अंत नसतो, पालवी नवनवीन फुटतेच प्रेमात.

प्रेमाला पर्यायच नसतो, प्रेमच असतो पर्याय प्रेमात.

प्रेमाशिवाय काहीच नसते, सर्व सामवलेले असते प्रेमात.

करा प्रेम हे वाईट नसते, करा प्रेम,प्रेम, प्रेम, रहा प्रेमात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance