प्रेमात असच असायचं
प्रेमात असच असायचं
तुझ्या माझ्या मधलं नातं
कधीच नाही तुटायचं
तुझ्याकडून अनं माझ्याकडून
कधीतरी चुकायचं
थोड तू अनं थोड मी
एकमेकावर रूसायचं
विसरण्यास सा-या गोष्टी
समेटाला घडीभर बसायचं
थोड सांगायचं अनं थोड एेकायचं
थोड रडायचं अनं थोड हसायचं
प्रेमात असच असायचं

