कवी कल्पनांचे हेच वावडे
कवी कल्पनांचे हेच वावडे
1 min
28.1K
कवीबोली जे.....
मज शब्द कळेना
सोडवील्यावीन मज चैन पडेना
मन धावे चोहीकडे
कवी कल्पनांचे हेच वावडे
तूच सोडवीशी हे कोडे
सुटता कोडे बंध मोकळे
शब्द न फिरती कवीकडे
बांधून ठेवतसी चारोळ्यांतून
कासावीस श्रोते सगळे
कवी कल्पनांचे हेच वावडे
तूच सोडवीशी हे कोडे
श्राव्यातून सारी कवीता
त्या शब्दांचाही घाम गळे
एक शब्द ओळखीचा
बाकी सारे इकडे तिकडे
अर्थ लावता या शब्दाचा
कवीरायांचे ते नाव कळे
कवी कल्पनांचे हेच वावडे
तूच सोडवीशी हे कोडे
