STORYMIRROR

Babu Disouza

Romance

3  

Babu Disouza

Romance

प्रेमार्जव

प्रेमार्जव

1 min
224

साजतो ना मी तुला ग साजणी

साजरी तू या चंद्राची चांदणी

अनुरूप आपली जोडी गणी

जनांमध्ये म्हणती राजा राणी -१-


तू माझ्या हृदयाची हिरकणी

शोभतसे शय्यी शृंगार मणी

वाटे बरसली सर श्रावणी

मत्त ही गंधाळली रातराणी -२-


सहवास दे तू माझी मागणी

यौवनी रंगतदार लावणी

पाहता तुला विसरे तत्क्षणी

आपसूक ओठात प्रीत गाणी -३-


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance