प्रेमाला नाही कधीही शेवट
प्रेमाला नाही कधीही शेवट
तुझं मन अजूनही नाही समजलं
मनात काय ते अजूनही नाही उमजलं
किती दिवस आहे तुझ्या मी जवळ
तुला नाही समजलो हे मात्र नवल
सहवास हवा हवासा वाटतो तुझा
तू गेल्यावर वेळ नाही जात माझा
पुर्वी सारखे तुझ्यावर आज ही प्रेम माझे आहे
अजूनही कळेना कोणत्या नजरेने मला तू पाहे
आहे जागा तुझी खोलवर माझ्या हृदयात
आहे का मी? तुझ्या हृदयाच्या एकातरी कोट्यात
प्रत्येक गोष्टीला असतो कधी तरी शेवट
पण माझ्या प्रेमाला नाही कधीही शेवट
प्रेमाला नाही कधीही शेवट...

