STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

2  

Sanjay Dhangawhal

Romance

प्रेमाच्या गावात

प्रेमाच्या गावात

1 min
244

तुझे माझे प्रेमाचे

एकच गाव आहे

ह्रदय त्याच नाव आहे

त्याच गावात प्रवेश करायचा आहे

तिथेचतर तुला मला 

एक व्हायच आहे


त्या मार्गावरील प्रवास

सहज सोपा नसला तरी

अवघड नाही

काटेच असलेतरी

वेचायला जड नाही

त्याच वाटेवरून तुला

माझ्या सोबत यायच आहे

बघ तुला यायला जमेल का ?


तुला आणि मलाही माहीत आहे

भावनांच्या पारावर

तुझे माझे मन रोज

भेटतात

तिथे तुझे माझे 

हितगुज करतात

काय करायचे कुणाला

काहीच कळत नाही

होकार नकाराच्या 

वळणावर येवूनही

थांबलेली पावले मागे

वळत नाहीत

तुझी माझी वाट वेगळी होताना

डोळ्यात बंद करून

घेण्यासाठी

मागे वळून बघितल्याशिवायही

राहवत नाही


गालावरच्या हसूलाही

आता वाटायला लागले

अस बघून बघून

किती दिवस हसायचे

ऐखदा भेटून बोलून तरी

घ्यायचे

तुझ्या माझ्या नजराही

एकमेकांना बघत असतात

चोरून चोरून बघण्याच कारण विचारतात 

पण ठरवूनही मनातल

बोलता येत नाहीत

प्रेमाच गावही बदलवता येत नाही


तुझ्या माझ्या मिलनाचा

मुक्काम ऐकाच गावात

व्हावा

म्हणून मी तु येण्याच्या

प्रतीक्षेत आहे

उघडा आहे ह्रदयाचा

दरवाजा

बघ तूला यायला जमेल का ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance