STORYMIRROR

Uddhav Bhaiwal

Romance

3  

Uddhav Bhaiwal

Romance

प्रेमाच्या चार चारोळ्या

प्रेमाच्या चार चारोळ्या

1 min
347

"प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे"

मंत्र मजला पाठ आहे

प्रेमभरे जगास पाहतो 

म्हणूनच कणा ताठ आहे  

....................................... 

संकटे अनेक झेलली कारण

तुझ्या प्रेमाची ऊब होती

अडथळे पार करीत जगणे

ही तर मजा खूब होती

....................................... 

एकतर्फी प्रेमाची ती

बघा काय गत होते

हाती तर काही येत नाही

उरलीसुरली पत जाते

.....................................

नजरेसमोर असूनही

कोसो दूर असतेस तू

का अशी पळतेस तू

का अशी छळतेस तू

   ****


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance