Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

4.0  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

प्रेमाचे एक सत्य

प्रेमाचे एक सत्य

1 min
11.9K


फुकट प्रेम करणारे ह्या जगात लाखो दिसतील 

तुझ्या बिकट प्रसंगी हेच तोंड लपवत फिरतील 

खोटी स्तुती सुमने सांगून तुझे मन वळवतील 

प्रेमाच्या जाळयात अडकवून तुला बंदिस्त करतील  


तुझ्या मनमोकळ्या स्वभावाचा ते वेगळाच अर्थ काढतील 

कामवासनेने धुंद होऊन तुझ्या आयुष्याची राख रांंगोळी करतील 

प्रेम करताना तुला ते काळीज म्हणणारे असतील 

प्रेमाचा अंत झाल्यावर तेच तुझा जीव घेतील  


प्रेमात फसविण्यासाठी ते अनेक उपाय योजतील 

तुझ्या आयुष्याचे नियोजन त्यांच्याकडे नसतील 

खरा संसार करणारे ह्या दुनियेत नाममात्र असतील 

खोट्या संसाराची स्वप्न दाखवून विश्वास घात करतील 


खऱ्या आणि खोट्या प्रेमाचा अर्थ तुला अल्लड वयात कळलाच नाही  

लबाडीने प्रेम करून खरे प्रेम तुला दिलेच नाही

वेळ निघून गेल्यावर तू पश्चाताप करताना दिसली 

अतिघाई करून तू आयुष्य उध्वस्त करून बसली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy