STORYMIRROR

Rajesh Kendale

Tragedy

3  

Rajesh Kendale

Tragedy

तुला विसरून जायचंय

तुला विसरून जायचंय

1 min
27.7K


आज ना मला तुला विसरून जायचंय

मनात असलेलं आठवणींच काहूर मला शांत करायचंय

तुझ्या गोड आठवणी रोमरोमांत वसलेल्या

आज मला त्यांना मुळासकट उपटून काढायचंय

तुझ्यासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत विसरायचाय...

आणि झालंच जर कधी तर त्या प्रेमळ आठवणी सुद्धा धुडकावून लावायच्यात

तुझ्यासोबत घालवलेला एक न एक दिवस मला तुझ्या विरहात जाळायचाय


आज ना मला तुला विसरून जायचंय

आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या चुकीचा मला पश्चाताप करायचाय

त्या सुंदर चुकीला आठवून आज पुन्हा एकदा मला खूप खूप झुरायचंय


आज ना मला तुला विसरून जायचंय

पण आज वेळ अशी ठेपली आहे कि.....

मी कुणाजवळ व्यक्त होऊ शकत नाही

इच्छा असताना मोकाट हिंडण्याची

मी एकटा होऊन बसलो आहे...

तुझ्या आठवणींच्या जाळ्यातून मला मुक्ती मिळालेली नाही

डोळ्यात असून पाणी मला रडायचे नाही

कारण आत्म्याला रडता येते असे मी तरी कधी ऐकले नाही...


तरी सुद्धा मला आज ना तुला विसरून जायचंय

आणि माझ्या जीवनाच्या अंतानंतरही मला फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमात रहायचंय

आणि मला तुझ्या प्रेमात राहता येणार नाही म्हणून मला ना आज खूप खूप रडायचंय.....

मला ना आज तुला विसरून जायचंय.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy