STORYMIRROR

Rajesh Kendale

Romance

2  

Rajesh Kendale

Romance

निःशब्द

निःशब्द

1 min
14.6K


प्रेम माझ्या मनातले, तुला सांगायला आलो।

शब्द तुझ्या ओठातले ऐकून, मीच निःशब्द झालो।।


डोळे तुझे हसरे, गूढ काही सांगे।

बोलता बोलता केसाची बट, हळूच कानामागे।।


बोलताना मधेच स्मित करायची सवय तुला वेगळी।

त्यातून उद्भवे सुंदर, मग गालावर खळी।।


त्या खळीमध्ये पडलाय, गुंतून जीव माझा।

तुझ्या या रुपामुळे, मज हृदयाला का व्हावी सजा।।


हृदयाची माझ्या अवस्था बोलण्याशिवाय, उपाय नाही काही।

तुला सांगण्याशिवाय मला, आता गंतव्य नाही।।


पण शब्दाला माझ्या, आजही वाचा फुटेना।

या जन्मात आपली भेट होईल, अस मला वाटेना।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance