प्रेम
प्रेम
प्रेम म्हणजे कसलं काय
सिनेमात दाखवतात तसलं नाय
प्रेम म्हणजे संजीवन
जन्मभराचे बंधन
एकमेकाला सांभाळत
तारेवरची कसरत.
प्रेम म्हणजे गाणे कां?
प्रेम म्हणजे नाचणे कां?
प्रेम असेच असते कां?
प्रेमाला सूर असतात पण शब्द नसतात
प्रेमाला ताल असतो पण नाचायला पायच नसतात.
प्रेम म्हणजे सूर आणि ताल
ह्यांचे अजब अबोल रसायन.
सामंजस्य हाच सूर
समाधान हाच ताल
ह्यांचा मेळ जमला तर
शब्दांना जागाच नसते फार.
