मनाची गोष्ट
मनाची गोष्ट
एकटेपण वाटते तसे सुखद नसते
समजून घेणार्याची गरज पदोपदी भासते.
भोवतालच्या कल्लोळात जीणे नकोसे होते
कुठेतरी शांत निवांत बसावेसे वाटते.
अशाच एखाद्या निवांत क्षणी
आपलेच मन आपल्याशी बोलते.
हळूच कानात हितगुज सांगते
आपलेच मन आपल्याला नव्याने कळते.
नव्याची नवलाई क्षणभराने ओसरते
मनाची गोष्ट सांगायला जीवाभावाचे शोधते
असे नेहमीच होते, धावपळीत मन नीरवता शोधते
आणि नीरव क्षणी सोबत मागते
नव्याची नवलाई क्षणभराने ओसरते,
मनाची गोष्ट सांगायला जीवाभावाचे शोधते.