सोऽहं
सोऽहं
1 min
2.7K
स्वानंदातून उमटतो सोऽहं
परमेश्वराचा नाद सोऽहं
शिवशंकराचा हुंकार सोऽहं
श्वास उःश्वासाचा प्राण सोऽहं
सोऽहं सोऽहं नाद निरंतर.
शिवशंकराच्या डमरूतून
बन्सीधराच्या मुरलीतून
सरस्वतीच्या वीणेतून
देवकन्यांच्या मधुर नूपुरातून
झंकारतो हा नाद सुमधूर
विश्वाचे चैतन्य सोऽहं
विश्वाचे चैतन्य सोऽहं.
