STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

3  

Meenakshi Kilawat

Romance

प्रेम

प्रेम

1 min
814



भेट तुझी माझी

झाली संसारात

असेल कदापी

प्रीत नशिबात....


प्रेमात भाबडी

मनात फुलली

प्रारब्धात होती

भेट सामावली.....


होताच नजर

थेट ही आपली

विशाल जगात

आशा ही जगली....


ह्रदया भिजून

डोळ्यांतूनी येती

दिसता वाढती

अश्रृ ओघळती....


कोणीच कुणाचा

इथे नाही वाली

परंतू तू माझ्या

जीवनात आली....


डोळे जरी बंद

तूझेच चिंतन

ओठी अलगद

नकळे स्पंदन......


शब्दाचा उच्चार

प्रेमाचे स्मरन

सुखविते मन

जातोया शरन.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance