प्रेम
प्रेम


प्रेम
प्रेम तुझे, माझे सर्वांचे
असो ते कोणाचेही
ते सारखेच असते.
फरक फक्त एवढाच
कोणाचे खारट तिखट
तर कोणाचे मधुर असते.
प्रेमाला नसावी सिमा
जातीपातीची, धर्माची
वंशाची नि पंथाची.
त्याला नसावे बंधन
काळ्याचे अन् गोऱ्याचे
वयाचे नि लिंगाचे.
प्रेम असावे निर्मळ
निस्वार्थ पवित्र
अन् मायेचे
प्रेमात असावा ओलावा
मायेच्या नात्यांसाठी
आपल्या माणसांसाठी
पशु आणि पक्ष्यांसाठी.