प्रेम म्हणजे काय असतं...
प्रेम म्हणजे काय असतं...
प्रेम म्हणजे ओढ
जाणिवेची पखरण
प्रेम म्हणजे विश्वास
सर्वस्वाचे समर्पण
प्रेम म्हणजे त्याग
भरली ओंजळ रीती
प्रेम म्हणजे काळजी
हरवण्याची भीती
प्रेम म्हणजे आठवण
श्वासात जपलेले नाव
प्रेम म्हणजे वेदना
न दिसणारा घाव
प्रेम म्हणजे भक्ती
चरणात विसावणारी
प्रेम म्हणजे करुणा
सावळ्याच्यात रमणारी
प्रेम म्हणजे कर्तव्य
नसानसात उसळणारं
प्रेम म्हणजे ज्वालासम
शत्रूला धूळ चाखवणारं

