STORYMIRROR

Hema Jadhav

Others

3  

Hema Jadhav

Others

प्रेमाची ऊब

प्रेमाची ऊब

1 min
294

वेध गुलाबी थंडीचे

झोंबु लागला गारवा

दूर परदेशी सखा

त्यास निरोप धाडवा


शेकोटीची ऊब जरी

हवा जवळी साजन

नवी नवलाई प्रीत

जळे माझे तनमन


रात चांदण्याची शुभ्र

मला नाही लुभावत

मन पक्षी घेई धाव

सजनाला आठवत


ऊब मिठीची लाभता

थंडी गुलाबी भावते

श्वास श्वासात गुंफता

रात प्रणयी जागते


सरसर येई काटा

अंगी लव शहारते

स्पर्श अर्थ उमगता

सखी बावरी लाजते


थंडी गुलाबी गुलाबी

शाल धुक्याची पांघरी

सजे सौंदर्य सृष्टीचे

प्रेम रसाच्या घागरी


पेले चहाचे भरता

डाव गप्पांचा रंगतो

शेकोटीची ही मैफील

संग आनंदे दंगतो


Rate this content
Log in