STORYMIRROR

Hema Jadhav

Others

4  

Hema Jadhav

Others

गझल प्रेम आईचे

गझल प्रेम आईचे

1 min
167

आई तुझ्या जिव्हाळा कसलीच तोड नाही

दाही दिशा फिरावी, मिळणार जोड नाही


उतरण कशी करावी, मायाच आगळी ही

पाणावल्या क्षणांना, कुठलाच मोड नाही


सोसून त्या कळा नव प्राणास जीव देई

श्वासात श्वास चाले, नाते विजोड नाही


भारावल्या मनाला, हर्षास रंग चढतो

याहून कोणते ते नातेच गोड नाही


सुख लाभते जगी या, आईस मान मोठा

नाते जगी निराळे, प्रेमात कोड नाही



Rate this content
Log in