प्रेम
प्रेम
1 min
306
प्रेम प्रेम गीत
गाते तुझ्या आठवात
हुंदक्याची रात
जागे नयनात
प्रीतीच्या बोलाला
भावनेचे मोल
गुंजते कानात
गितातले बोल
मावळती दिशा
धुंद प्रकाशात
कुजबुज न्यारी
हातातला हात
नीरव शांतता
नयनांची भाषा
प्रीतीचा ओलावा
आर्त अभिलाषा
नसता कोठेही
वसे हृदयात
हासते क्षणात
तुझ्याच छायेत
