प्रेम (भावगीत)
प्रेम (भावगीत)
1 min
208
जागेपणी स्वप्न हे, डोळ्यात का हसावे
का भेद हा असा रे, प्रेमात मी फसावे।।धृ।।
तुझीच ओढ का रे, का आस ही तुझी रे
तुझेच गीत माझ्या, कानात गुंजले रे
पाहता दर्पणात, रूप तुझे दिसावे
होऊन बावरी मी, रोमरोमी सजावे
का भेद हा असा रे, प्रेमात मी फसावे।।१।।
डोळ्यात साठले रे, मनात गोठले रे
तू छेडील्या त्या तारा, ओठांत गायिले रे
का वाटे मजसी रे, शब्दांत तू वसावे
या धुंद चांदण्यात, तुजसवे असावे
का भेद हा असा रे, प्रेमात मी फसावे ।।२।।
तू घेतलास हाती, हा हात ज्या हाताने
मी बांधिले वचनी, प्रेमात या सुखाने
जन्मोजन्मी रे सख्या, प्रेम तुझे मिळावे
ही ओढ ना संपावी, प्रीतीत बहरावे
का भेद हा असा रे, प्रेमात मी फसावे।।३।।
