STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Romance

3  

Sarita Sawant Bhosale

Romance

प्रेम करावं

प्रेम करावं

1 min
210

प्रेम करावं राधेसारखं निस्सीम वेणूच्या बासरीवर निखळ श्यामरंगाच्या रंगावर झोकून व्हावं एकरूप नावही विलग न होण्याच्या वाटेवर


प्रेम करावं मीरेसारखं

निस्वार्थी दंग व्हावं त्या नामावर

विषाचा प्याला ओठावर परि समर्पण जीवन प्रेमावर अर्पूनी भान सारं निरपेक्ष चालावं काटेरी वळणावर


प्रेम करावं द्वेष, मत्सरापलीकडंच आसमंतात दरवळणाऱ्या कस्तुरीगंधासारख धगधगत्या अग्निदिव्यातून पार होऊन अविरत उजळणाऱ्या प्रकाशासारखं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance