*"प्रेम करावे शतदा
*"प्रेम करावे शतदा
जन्म भऱ्याची साथ असुनी
क्षणोक्षणी गीत गावया इथे
जवळीक असावी मना सदा
असे प्रेम करावे शतदा येथे...
सागर लाटांची आवाज
कधी गर्जूनी आल्हादते
भरतीला उधाण येतसे
शरदाच्या चांदण्या राती..
प्रेमसंध्याच्या समयी
आलास माझ्या जीवनी
अलगद मला या प्रेमाचे
धडे दिले तू साजन मनी...
सहजच ही प्रेमसंध्या
हितगूज करिते क्षणोक्षणी
सारे अटकून रहाते काम
सख्या स्वर येता तुझा कानी....
रेशमाच्या धाग्यासारखे
अतूट बंध असतात प्रेमाचे
दूरी आली असता कधी
तुकडे होतात रे या ह्रदयाचे....
नित्य मी तुझ्यासाठीच
सजतय अन् जगतेय
तु नसला की मन माझ
थोडथोड कुरबूर करतय...
प्रियकरा तू आहेस राजा
माझ्या या दिलामधले सूर
कळवळते माझा रे जीव
नजर ना लागे कोणाची क्रृर...

