प्रेम हे असंच असतं
प्रेम हे असंच असतं
असतोस जवळी माझ्या जेव्हा
भाळलास क्षण माझ्या मना
रात्री उशीच्या कुशीत निजलेले
स्वप्नाच्या दुनियेत विसावलेले
क्षण हे आनंदाचे मला तू दिलेस
डोळ्याच्या पापणीत प्रेम हे दडलेले
वाटते प्रेम हे खोल दरीत पोहोचलेले
वळूनी माझ्याकडे बघताक्षणी म्हणावं
तुझ्यावर मी प्रेम किती म्हणून करावं?
असे म्हणतात तिने क्षणी
ओठावरी उमटले शब्द अलगद
मी परी प्रेम करतो तुझ्यावरी
असे मी हसताच परी
मिश्किल हसू फुटले गालावरी
हळूच लाजली माझ्यावरी
प्रेम हे असाच असतं
प्रेम हे असंच असतं

