STORYMIRROR

Raghu Deshpande

Romance

4  

Raghu Deshpande

Romance

प्रेम अंकुर....!!

प्रेम अंकुर....!!

1 min
278

कधीचेच होते

तुला सांगायचे

सगळे एकदा

तुला बोलायचें.....!


निमित्त केवळ

शाळेत येण्याचे

चोरुन चोरुन

तुला बघायचें.......!


मुद्दामच दिली

माझी वहीं तेव्हा

नाव होते तुझें

ते दाखवायचें.....!


वयच अल्लड

उमज नव्हती

एक ओढ होती

तुला भेटायचें.....!


मनाची बेचैनी

ह्रदयी काहूर

आणि समाधान

एका नजरेचें......!


आजही वळण

ते तसेच आहे

मान वळवून

जेथें हसायचें.....!


पहिल्या प्रेमाचे

नवीन बाळसें

नुतन अंकुर

असे डुलायचें....!


एक अनामिक

तगमग होती

धाडस न झाले

कधी सांगायचे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance