प्रभात
प्रभात
नभी रेशमी दिशा उजळली,
तनामनातून प्रभा उजळली.
दवथेंबातून चमचमनाऱ्या,
रानफुलांनी वाट उजळली.
बिंब केशरी झुले नदीतून,
खळाळनारी लाट उजळली.
पानांआडून मंजुळ किलबिल,
घरट्यातूनही उषा उजळली.
सडासारवण अन रांगोळ्या,
मांगल्याची रूपे उजळली.
धूप दिपांनी दरवळणाऱ्या,
देव्हाऱ्यातून ज्योत उजळली.
प्रसन्नतेच्या मनात लहरी,
घराघरातून मने उजळली.
हर्षित झाली धराच अवघी,
चराचरातून प्रभा उजळली.
