STORYMIRROR

Archana Murugkar

Abstract

4  

Archana Murugkar

Abstract

पंखांना देते बळ

पंखांना देते बळ

1 min
330

कापूस, दोर, चिंध्या, सारेच नेत जाई

चोचीत ठेवी काड्या, नक्षीत खोप होई. 


प्रेमात ऊब आहे, मातृत्व भाव जागे

जीवात जीव कोंडे, कष्टात प्रेम जागे. 


आई पिलास देई, चोचीत अन्न खाण्या

जाणून भूक त्यांची, खोप्यात धान नेण्या. 


पुन्हा घरास येई, बाळांस फार घाई

दाणे मुखात ठेवी, कल्लाच शांत होई. 


पिल्लांत धाव घेण्या, पंखात शक्ती येई

रानात दूर नव्या, विश्वात मुक्त जाई. 


मातेस धैर्य भारी, नाहीच हक्क दावी

धावात बालकाच्या, आनंद तीट लावी.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract