पिंपळ
पिंपळ
पिंपळाचे पान पिवळे
पतंगा परी पडती
पांगती पाखरे पहा
परवड पिंपळाची पाहती
प्रार्थना पक्षी पाखरांची
पालवी पेरू पाहती
पाषाणास पाझर प्रसवता
पानपिसारा पिंपळी पसरती
पावसाळी पाणी पाट
पार पोटात पाझरती
पिंपळाला पान पालवी
पुन्हा पानांची पावती
पदार्पण पुष्प पानांचे
पाहता पाखरे परतती
पिसाट पाऊस पिसाळता
पागोळ्यांच्या पणत्या पेटती
