दुष्काळी झळा
दुष्काळी झळा
तहानलेले चातक झालो
दाही दिशा फिरुन आलो
पाणी कुठे मिळे ना
देवा आम्ही कसे पापी झालो
अन्ना विना गेली कपीला
लेकरु ही तडफडतय माझं
पाणी कुठे मिळेना
वाटु दे आता थोडी लाज
धरणी भेगाळली सारी
हिरवाई उन्मळून पडली
पाणी कुठे मिळेना
भकास द्रूष्ये झाली
शापा ला या उ:शाप दे रे
कोप आता सरू दे
पाणी कुठे मिळेना
धार पावसा ची झरु दे
मति आमुची दुषित झाली
झाडे वेली तुडवित गेली
पाणी कुठे मिळेना
पश्चातापा ची वेळ आली
