STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

फुलांनी घात केला

फुलांनी घात केला

1 min
310

चूक कुणाची शोधू नकोस धुक्याने घात केला

दोष काटयांस देऊ नकोस फुलांनी घात केला


बांध नदीचा केंव्हा फुटला उन्हाळ्यातील दिवसा

झोपेत येत पावसातील जलाने घात केला


पिके कुठेही कशी दिसेना शेती मधली सजणा

प्रिये आपल्या कुंपणातील कळीने घात केला


नाव बुडाली अचानक कशी शांत डोहात राजा

राणी माझ्या भोवतालच्या दिशांनी घात केला


संसार तुटे आपला कसा बिन वादाने रमणा

प्राणाहूनी प्रिय असे त्या प्रियेने घात केला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance