फक्त तुझ्यासाठी
फक्त तुझ्यासाठी
जेव्हा तुझी आठवण येते
तेव्हा आजही मी
त्या वळणावर येवून
तुला आठवत असतो
जेथे आपण कधीतरी
लांबूनच एकमेकांकडे बघायचो हसायचो
नजरेच्या ईशाऱ्यानेच बोलायचो
पण न भेटता मी तुझ्यात गुंतत राहीलो
मला वाटायच
आपण कधीतरी कुठेतरी
भेटाव बोलाव मनातल काय ते सांगाव
पण माझ्या होकाराला तू
नकार देऊन काळजावर
घाव करून गेलीस
तुझ्या अशा लडिवाळ हसण्याचा बघण्याचा
अर्थ मला कळलाच नाही
कळला असता तर
तुझ्यात कधी हरवलोच नसतो
प्रेम वेडे असते म्हणे
म्हणून मी त्या वळणावर येऊन तुला आठवत असतो
आजही मी तुझ्याच आठवणीत जगतोय
फक्त तुझ्यासाठी
