Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Romance

2  

Sanjay Dhangawhal

Romance

फक्त तुझ्यासाठी

फक्त तुझ्यासाठी

1 min
80


मी बघतोय तुला

आजही तू तिथेचं

रोज येते जेथे मी

तुला भेटायला यायचो


तासंतास तुझी प्रतिक्षा करायचो

तू मला पाहून लपून जायची

न भेटताच निघून जायची

मी तसाच तुझी वाट पहात रहायचो

तू न भेटण्याचा राग घेवून जायचो


तरीही तुझ्या प्रती ओढ 

माझी कायम होती

पण तुला ती कळतं नव्हती

हे असे बरेच दिवस चालत होते

तू येवूनही भेटतं नव्हते

कारण मला कळायचे नाही 

पण तुझे तिथे येण्याचे टळायचे नाही


मी रागावलो म्हणून

आता भेटायला येत नाही

असं तुला वाटायचे

मला बघण्यासाठी

पावले तुझे तिथेच वळायचे

माझ्यासारखं तासंतास बसून

तू माझी वाट बघायची

न भेटण्याची वेदना

तेव्हा तुला कळायची


तुला वाटतं मी आहे 

पण येत नाही

पण खर सांगू का

तू मला निश्चितच

भेटण्याचं सांगितल्यावर

मी आनंदात धावत निघालो

अशाच एका वळणावर

अपघात झाला नी्

तुला न भेटताच देवा घरी गेलो


मी आता बघतोय रोज तुला आभाळातून

तू खूप थकलीस वार्धक्याने झुकलीस

कधीतरी मी तुला भेटायला यायचो तेथे तू

आजही काठी टेकत येते

तासंतास बसून मी  

येण्याची वाट पहात निघून जाते


जर तू मला भेटली असतीस

तर आपण सोबत राहीलो असतो

अस तुला एकटं सोडून मी गेलो नसतो

खरतर मी फक्त तुझ्यासाठीच जगत होतो

पण तुझं माझं एक होणे

नियतीलाच मंजूर नसावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance