STORYMIRROR

Shobha Wagle

Romance

4  

Shobha Wagle

Romance

पहिले प्रेम

पहिले प्रेम

1 min
324

आज ही आठवतात ते दिवस

मस्त मजेत कॉलेजात घालवलेले

अभ्यासा व्यतिरिक्त मित्रा संगतीत

कट्टयावरच्या गप्पा गोष्टीत रंगलेले.


होती राधिका सर्वांचीच मैत्रीण

सर्वांशी मोकळ्या मनाने बोलायची

मीच बोलत नव्हतो तिच्याशी पण

मनातून मला ती खूप आवडायची.


परिक्षा येता मग्न सारे अभ्यासात

पुस्तकात मात्र मला दिसे राधिका

हुरहुर वाटे मना न दिसे ती जेव्हा

तिज वर्गात पाहता आवडे तासिका.


मला कळेना काय झाले मला

राधिका न दिसे तो बेचैन होई जिवा

मित्र मैत्रिणी चिडवून हसण्यावरी नेई

म्हणती प्रेमात बुडालेला दिसतो भावा.


वर्षे सरली कॉलेज शिक्षण पूर्ण झाले

अबोल प्रीत माझी मनातच राहिली

त्रस्त सारे आप आपल्या कामकाजात

पुन्हा मात्र राधिकाला कधी न पाहिली.


मित्र बोलले लग्न करुनी गेली ती परदेशी

मी ही आता रमलो माझ्या सुखी संसारात

पण कधीतरी मनातून मी साद घालतो

जेव्हा ते मला कॉलेज दिवस आठवतात.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance