पहिला ऋतू प्रेमाचा
पहिला ऋतू प्रेमाचा
पहिला पाऊस
पहिली आठवण
पहिली आपल्या
नात्याची साठवण
पहिला वारा
पहिला शहारा
पहिला आपल्या
प्रेमाचा नजारा
तिचे पाहणे
तिचे हसणे
तिचे बोलणे
वाटे जणू एक
स्वप्न नवे
नवे ऋतू
नवे रंग
नवे गीत
भासे जणू
नवी प्रीत
सागर लाटांचा खेळ
त्यात मोत्यांचा बहर
किनारा झाला आतुर
भेटीसाठी त्याची हुरहूर

