STORYMIRROR

vaishali vartak

Classics Others

4  

vaishali vartak

Classics Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
380

काळ्या ढगांनी भरलेअंबर

उडे पाचोळा दाही दिशात

वारा वाहे सोसायट्याने

गडगडती मेघ अंबरात


नाचती हर्षे मुले अंगणी

टप टप धारा बरसता अवनी

मोर दावी नृत्य मनोहर

झेलती पक्षी थेंब, पंख पसरुनी


पडता धारा अवनी भिजली

तृप्त झाली पाणी पिऊनी

टप टप पागोळ्या पडती दारी

गंध मातीचा दरवळे दिशातूनी


जो तो जाई क्षणात भारावूनी

पहिल्या पावसाची मजाच वेगळी

वृक्ष लता वेली गेल्या तरारूनी

कांदे भज्यांची चवच आगळी.


पहिला पाऊस राहे स्मरणात

जून्या आठवणींना आणतो पूर

 घडले असूनी जरी गतकाळात

आठवांनी भरुन येतो ऊर



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics