पहिला डाग
पहिला डाग
तेराव्या वर्षी पडला पहिला डाग
ओटी पोटी होऊ लागली आग
दुखू लागले पोटात
दुःख दाटून आले मनात
अशुद्ध रक्त शरीर फेकते बाहेर
पोरी तुझे गर्भाशय होतंय तयार
ह्या काळामध्ये तू घ्यावा सकस आहार
तू होणार आता बाई
सांगत होती मला आई
आता खेळण्या-बागडण्या साठी तु करू नको घाई
आजी सांगते पाळीमध्ये तू वापर हे पांढरे वस्त्र
ह्या काळामध्ये तू आहेस अपवित्र
घरामध्येच बसून रहा दिवस अन् रात्र
आजोबा सांगतात