पगार.
पगार.
पगाराच पाकीट हातात पडताच
संसाराची सारी गणित
डोळ्यासमोर भुकेलेल्या कुत्र्यासारखी
आ वासुन उभी राहतात
आणि एक एक खर्च वजा होताना
हातात उरतात
नेहमी सारखीच
काही न सुटलेली गणित
रिकामं पाकीट आणि
काही स्वप्न....
पुन्हा पुढच्या
पगाराच्या आशेवर.
पगाराच पाकीट हातात पडताच
संसाराची सारी गणित
डोळ्यासमोर भुकेलेल्या कुत्र्यासारखी
आ वासुन उभी राहतात
आणि एक एक खर्च वजा होताना
हातात उरतात
नेहमी सारखीच
काही न सुटलेली गणित
रिकामं पाकीट आणि
काही स्वप्न....
पुन्हा पुढच्या
पगाराच्या आशेवर.