श्राद्ध....
श्राद्ध....
आज इतके वर्षे झाले
बाप जाऊन पण
इतक्या वर्षेत बापाचं श्राद्ध
कधी घालावसं वाटलंच नाही...
कारण..
जिवंत असताना तो
एकदा ही
माझ्या साठी जगला
असं मला कधी वाटलंच नाही
रोज रात्री दारू पिऊन
बापाला येताना पाहिलं की
मी घराबाहेर पडायचो अन्
त्याच्या भितीनं कधी कधी
उपाशी पोटीच घराबाहेर झोपायचो..
मी लहान असताना
बापानं कधी जवळ घेऊन
मायेनं डोक्यावरून
हात फिरवल्याच आठवत नाही...
लाथा बुक्या सोडल्या तर..
शाब्बासकी ची थाप माझ्या
पाठीवर कधी पडलीच नाही...
नशिबाची आणि पुस्तकाची पानं
मी त्याला हवी तशी
पलटत होतो..अन्
तो माझा बाप होता म्हणूनच की काय मी
मुकाट पणे सारं सोसत होतो
तो... गेला तेव्हा
त्याच्यासाठी
माझ्या डोळ्यांच्या कडा सुध्दा
ओलावल्या नाही....
कारण
माय गेली तेव्हा
बाप मायेला शेवटचं बघायला
सुध्दा आला नाही...
पण तरीही वाटतं
माझ्या बापानं
एकदातरी
माझ्याशी बापासारख
वागायला हवं होतं...
बाकी काही नाही
पण एकदा तरी
मायेसारख कुशीत घेऊन
गोजांरायला हवं होतं
कारण..
तेवठा तरी बाप माझ्या
लक्षात राहीला असता
आणि
माझ्या लेखी श्राद्ध
घालण्या इतका
माझा
बाप मोठा झाला असता...!
